रस्ता कामाने घेतला बळी, बहिणीला भेटून गावाकडे जात असलेल्या भावाला वाहनाने उडवले

पिंपळा धायगुडा ते अंबाजोगाई येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या अपूर्ण कामाचा आज पहिला बळी गेला आहे. डीघोळ देशमुख गावचे विकास वैरागे यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर रस्त्याच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बहिणीची भेट घेऊन गावाकडे जात असलेल्या भावला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.पिंपळा ते आंबेजोगाई रस्त्याच्या भगवान बाबा चौकापर्यंत हा रस्ता आठ महिन्यात एक बाजूसुद्धा पूर्ण झालेला नाही.रस्त्यावर अनेक ठिकाणी एका बाजूने खड्डा खोदून ठेवल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालावे लागते आहे. अरुंद रस्त्यांमुळे दुचाकी स्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाळूची राखेचे हायवा टिप्पर अशा वाहनांमुळे या रस्त्यावरून चालणे अवघड होऊन बसले आहे.गेल्या सहा-आठ महिन्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याचा एकही अधिकारी या रस्त्यावर फिरकला नसल्याने या रस्त्याचे काम होणार की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या