शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शास्त्रज्ञ डाॅ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव, शास्त्रज्ञ डॉ मानवेंद्र सखाराम काचोळे यांचे बुधवारी (दि.27) सायंकाळी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मे 2014 मध्ये ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख, प्राध्यापक यापदावरून सेवानिवृत्त झाले. 2009-10 या काळात ते कुलसचिव तसेच 2006 ते 2010 काळात ते विभागप्रमुख व्यवस्थापन परिषद सदस्य होते.

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी अखेरपर्यंत काम केले. सध्या ते शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कार्यरत होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याच पक्षाच्या वतीने 2004 मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सध्या एमजीएम विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी जिल्ह्यामध्ये ते संशोधक संचालक म्हणून कार्यरत होते. जवखेडा तालुका कन्नड येथील मूळ रहिवासी असलेले डॉ काचोळे हे संभाजीनगरातील खोकडपुरा येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंगलताई, दोन मुली, जावई व मोठा मित्र परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या