AUS Vs ZIM – फक्त 207 सामने खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. वयाच्या चाळीशीत असतानाही त्याच्या फलंदाजीतला आक्रमकपणा कमी झालेला नाही. चढ-उतारांचा हा त्याचा प्रवास एक ऐतिहासिक वळणावर येऊन पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियावरुद्ध सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात टेलरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला आहे.

झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पहिला एकदिवसीय सामना सुरू झाला आणि अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज ब्रेंडन टेलरने इतिहास रचला आहे. चाळिशी ओलांडलेल्या टेलरने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ खेळणारा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरताच टेलरची वनडे कारकीर्द 22 वर्षे आणि 4 महिन्यांची झाली, तर सचिन तेंडुलकरची ही कारकीर्द 22 वर्षे आणि ३ महिन्यांची होती. टेलरने 20 एप्रिल 2004 रोजी श्रीलंकेविरुद्ध आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, यादरम्यान त्याने एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली होती आणि आयसीसीने त्याच्यावर साडेतीन वर्षांची बंदी देखील घातली होती. या सर्व अडचणींवर मात करत आज टेलरने हा मोठा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ब्रेंडन टेलरने आपल्या आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फार सामने खेळले नाहीयेत. तसेच त्याच्या नावावर धावाही फार नाहीयेत. असे असतानाही त्याने सचिनला मागे टाकले आहे. तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 463 सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या होत्या, तर टेलरने आतापर्यंत 207 सामन्यांमध्ये 6,704 धावा केल्या आहेत. 2011 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर आणि बंदीचा कालावधी पूर्ण करून 2025 मध्ये पुनरागमन करणाऱ्या टेलरने ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे.