Ind Vs Aus दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा दारुण पराभव, मालिकाही गमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या पराभवांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी पराभव केला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने मालिका खिशात टाकली आहे.

गोलंदाचांचा निराशाजनक खेळ व सलामीच्या फलंदाजांची खराब खेळी यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्या उलट ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व इतर फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत टीम इंडियासाठी 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ने 64 चेंडूत दणदणीत 104 धावा करत हिंदुस्थानच्या फलंदाजांची पिसं काढली. त्याला वॉर्नर (83), फिंच (60), लबुग्ने (70), मॅक्सवेल (63) यांनी चांगली साथ दिली.

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन व मयंक अगरवाल यांनी सुरुवात तर चांगली केली. मात्र 58 धावांवर या दोघांची जोडी फुटली व धवन माघारी फिरला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने कर्णधाराला साजेसा खेळ केला. मात्र त्याच्या 83 धावा टीम इंडियाला विजयाकडे नेण्यासाठी पुरशा नव्हत्या. त्यानंतर लोकेश राहुल व हार्दिक पांड्याची जोडी काही काळ स्थिरावली होती. त्यावेळी टीम इंडियाच्या आशा पल्लवित झालेल्या मात्र ही जोडीही फुटली व टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.