ब्रिस्बेनला होणार 2032ची ऑलिम्पिक स्पर्धा

2032मध्ये होणाऱया ऑलिम्पिकचे यजमान पद अखेर ब्रिस्बेनने मिळवले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मतदानानंतर (आयओसी) बुधवारी याची अधिकृत घोषणा केली. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1956मध्ये मेलबर्न आणि 2000मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल 32 वर्षांनंतर प्रतिष्ठेची ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे.

ऑस्ट्रेलियात तिसऱयांदा होणार स्पर्धा

ऑस्ट्रेलियाला तिसऱयांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमान पद मिळाले आहे. तीन किंवा त्याहून अधिक वेळा ऑलिम्पिकचे आयोजन करणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा देश ठरणार आहे. याआधी अमेरिकेने सर्वाधिक चार वेळा ऑलिम्पिकचे आयोजन केले असून इंग्लंडनेही तीनदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमान पद मिळवलेले आहे. फ्रान्स, जर्मनी व ग्रीस या देशांनीही 2-2 वेळा ऑलिम्पिकचे आयोजन केले आहे. 2024मध्ये फ्रान्सदेखील तिसऱयांदा ऑलिम्पिकचे आयोजन करणारा देश बनणार आहे.

दोन क्रीडाग्राम बनविणार

2032च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दोन क्रीडाग्राम बनविले जाणार आहे. एक क्रीडाग्राम ब्रिस्बेनला, तर दुसरे गोल्ड कोस्ट येथे असेल. ऑलिम्पिक स्पर्धेची यजमानी मिळताच ब्रिस्बेन आणि ऑस्ट्रेलियामध्ये जल्लोष करण्यात आला. विक्टोरिया ब्रिजवर हिरव्या आणि पिवळ्या रंगाची लायटिंगही लावण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या