FIFA World Cup 2026 – ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, तुर्कीचा 2-0 गोलफरकाने उडवला धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने ‘ड’ गटातील पहिल्याच सामन्यात तुर्कीवर 2-0 अशी मात करीत विजयी सलामी दिली. तब्बल 24 वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या तुर्की संघाच्या आशांवर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच पाणी फेरले.

ब्रिटिश कोलंबियातील व्हॅन्कुव्हर येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नेस्टोरी इरानपुंडाने 27 व्या मिनिटाला शानदार गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास वाढला, तर तुर्कीवर दबाव निर्माण झाला. पहिल्या सत्रात मिळवलेली आघाडी कायम राखत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रातही आपला दबदबा कायम ठेवला. तुर्कीने बरोबरीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र ऑस्ट्रेलियाच्या भक्कम बचाव फळीसमोर त्यांचे सर्व हल्ले निष्फळ ठरले.