
जगातील ‘नंबर वन’ टेनिसपटू नोकाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मात्र देशात प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्याला मेलबर्न विमानतळावरच रोखण्यात आले. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला अन् जोकोविचला एकच नियम असायला हवा, अशी भूमिका घेत जगभरातील खेळाडूंनीही या वादात उडी घेतली, मात्र सर्बियाने आपला खेळाडू जोकोविचला संपूर्ण समर्थन देत या वादात उडी घेतली. त्यामुळे प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची घमासान सुरू होण्यापूर्वीच कोरोना नियमाच्या पार्श्वभूमीवर कोर्टबाहेर चांगलाच वाद पेटला आहे.
खेळाडूंनी केला राजकारणाचा आरोप
नोवाक जोकोविचला रोखण्याचा ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाला राजकीय किनार असल्याचा आरोप काही खेळाडूंनी केला. दोन वैद्यकीय पॅनलने जोकोविचला सूट दिल्याने सरकारने त्याला अडवायला नको, असे युक्रेनचा सर्जी शखोवस्की व अमेरिकन खेळाडू टेनिस सॅण्डग्रेन यांनी मत व्यक्त केले. मात्र काही देशांतील खेळाडूंसाठी कोरोना लस बंधनकारक करण्यात आली असल्याने जोकोविचसाठीच वेगळा नियम का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
‘कायदा सर्कांसाठी समान असून कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाहीये. त्यामुळे जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. नियम हा नियम असतो. विशेषत: जेव्ह आपल्या सीमेचा प्रश्न येतो त्यावेळी नियमांच्या कर कोणीही नाही. कोरोनामुळे जगातील सर्कात कमी मृत्युदर ऑस्ट्रेलियात आहे. आम्ही सतत सतर्क आहोत.’ – स्कॉट मॉरिसन, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया
‘मी नोवाक जोकोविचशी फोनकरून संपर्क साधला आहे. संपूर्ण सर्बिया देश या संकटात त्याच्यासोबत आहे. आमचे अधिकारी जोकोविचची समस्या सोडकण्यासाठी सर्क उपाययोजना करत आहेत. सर्बिया आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत जोकोविच न्याय आणि सत्यासाठी लढा देईल.’ – अलेक्झांडर कुसिक, राष्ट्रपती, सर्बिया



























































