
पुण्यातील वानवडी पोलीस चौकीजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षाचालक ठार झाल्याची घटना घडली आहे. 12 मे रोजी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला. संजय गणेश ठोंबरे (44) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कोथरूडच्या पौड रस्ता येथील रहिवासी आहेत. यासंदर्भात विजय ठोंबरे (42) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संजय हे 12 मे रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास रिक्षातून वानवडी बाजार पोलीस चौकीजवळून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातून खाली पडल्यामुळे संजय यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेले. या अपघातात अत्यंत गंभीर जखमी झाल्यामुळे संजय यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता पोलीस अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत.



























































