Tamilnadu Election 2026 – ऑटो चालकाने 5 वेळच्या आमदाराला केले पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडू निवडणुकीत थलापती विजय यांच्या तमिझागा वेत्री कळघम या पक्षाने मोठे यश मिळवले आहे. टीव्हीकेने उत्तर चेन्नईतील रोयापूरम या मतदारसंघात एका ऑटोचालकाला उमेदवारी दिली होती. के. विजय धाम असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी पाच वेळा आमदार राहिलेल्या जयकुमार यांचा पराभव केला आहे. विजय धामू हे ऑटोचालक असून विजय यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. विजय धामू यांना 55 हजारांहून अधिक मते मिळाली असून त्यांनी 14 हजारांच्या फरकाने विजय मिळवला आहे.