अक्षय कुमारचे ‘कार कलेक्शन’ पाहिले का? नाही तर मग बघाच! 

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याचा आज वाढदिवस आहे. 9 सप्टेंबर 1967 रोजी जन्मलेल्या अक्षयने ‘सौगंध’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये  एन्ट्री केली होती. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक अशा अनेक हिट चित्रपटात अभिनय केला. आज बॉलिबूडमधील सर्वात ‘फिट’ अभिनेता म्हणून अक्षय ओळखला जातो. अक्षय कुमार याचा 9 हा लकी नंबर असून त्याच्या सर्व कारच्या नंबरची सुरुवात ही 9 पासून होते. आज अक्षयच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्याला त्याच्या कारच्या कलेक्शनबद्दल माहिती देणार आहोत.

rolls-royce-phantom

अक्षय बर्‍याच वेळा Rolls Royce Phantom मध्ये फिरताना दिसला आहे.

इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे झाले तर Rolls Royce Phantom मध्ये  6.75 लिटरचे ट्विन टर्बो व्ही 12 इंजिन आहे. जे 460 बीएचपीची पॉवर जनरेट करते.या कारची किंमत 10 कोटी रुपये आहे.

bentley-flying-spur

अक्षयला बऱ्याचदा Bentley Continental Flying Spur कार चालवतानाही पाहण्यात आले आहे. 

Bentley Continental Flying Spur मध्ये 6.0 लीटर व्ही-8 इंजिन देण्यात आले आहे. जे 616 बीएचपी पॉवर आणि 800 एनएम टॉर्क जनरेट करते. यांची एक्स-शोरूम किंमत 4.4 कोटी रुपये आहे.

porsche-cayenne
Porsche Cayenne कार चालवतानाही अक्षयला बऱ्याच वेळा पाहण्यात आले आहे.  

Porsche Cayenne कार मध्ये 4.8 लीटर व्ही 8 टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 550 पीएसची पॉवर जनरेट करते. या लक्झरी कारची एक्स-शोरूम किंमत 1.19 कोटी रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या