हिंदुस्थानात Aston Martin ची लक्झरी एसयूव्ही DBX लॉन्च, काही नशिबवानच खरेदी करू शकतात ही कार!

ब्रिटनची वाहन उत्पादक कंपनी Aston Martin ने हिंदुस्थानात आपली नवीन लक्झरी कार Aston Martin DBX लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच लॉन्च करण्यात आली होती.

ही प्रिमियम कार कोणत्याही अडचणीशिवाय खराब आणि खडतर रस्त्यांवर सहजपणे धावू शकते. वेगवान कार चालविण्याची आवड असलेल्या लोकांना हिंदुस्थानात ही एसयूव्ही खरेदी करण्यासाठी 3.82 कोटी खर्च करावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची फक्त 11 युनिट्स कंपनी विक्रीसाठी हिंदुस्थानात उपलब्ध करणार आहे.

फीचर्स

या कारमध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, एक 12.3 इंचाचा मोठा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात येणार आहे, ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह सुपर शार्प ग्राफिक्ससह एक स्पोर्टी लेआउट देखील आहे. याचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर Apple कार प्लेला स्पोर्ट करतो. ज्यामध्ये आपण ड्रायव्हिंग मोडपासून नेव्हिगेशनपर्यंत सर्व प्रकारच्या माहिती मिळवू शकता.

इंजिन आणि स्पीड

Aston Martin DBX मध्ये 4.0- लिटर, ट्विन-टर्बोचार्ज्ड व्ही 8 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 6,500 आरपीएम वर 535 बीएचपीची पॉवर आणि 2,200 – 5,000 आरपीएम वर 700 एनएम टॉर्क जनरेट करते. या लक्झरी कारमध्ये 9-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर व्यतिरिक्त एक स्वयंचलित गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. Aston Martin DBX फक्त 4.5 सेकंदात 100 किमी प्रतितासाचा वेग पकडते. याची टॉप स्पीड 291 किमी प्रतितास आहे.

आपली प्रतिक्रिया द्या