Audi RS7 Sportback ची बुकिंग सुरू; ‘या दिवशी होणार लॉन्च…

Audi India ने आपली न्यू जनरेशन Audi RS7 Sportback ची बुकिंग सुरू केली आहे. कंपनीने यासाठी 10 लाख रुपयांची टोकन रक्कम निश्चित केली आहे. आज आम्ही तुम्हाला याच कारच्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

डिझाइन आणि स्टाईल

नवीन ऑडी RS7 चा पुढील भाग प्रोफाइलला अधिक आकर्षक बनवणारा आहे. या कारमध्ये एक ग्लॉस ब्लॅक हनीकॉम्ब ग्रिल, स्लीक मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स, त्रिकोणी बाजूचे पडदे, उंच हूड, स्लाइडिंग रूफलाइन, सिंगल बार एलईडी टेललाईट क्लस्टर, क्रोम इन्सर्ट विथ मॅसिव ब्लॅक डिफ्यूझर, 21 इंची अ‍ॅलोय व्हील्स देण्यात आल्या आहेत.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन

Audi RS7 Sportback या कारमध्ये 4.0 लिटर, ट्वीन-टर्बोचार्ज व्ही 8 इंजिन देण्यात आले आहे. जे डायरेक्टर इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे इंजिन 591 बीएचपीची पॉवर आणि 800 एनएम टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 8 स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

हिंदुस्थानात कधी होणार लॉन्च?

Audi RS7 Sportback ही कार 16 जुलै 2020 रोजी हिंदुस्थानात लॉन्च करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या