ऑटो इंडस्ट्रीला पुन्हा रुळावर येण्यास 4 वर्षे लागू शकतात – सीआयएएम

920

कोरोना या जागतिक संकटामुळे प्रत्येक क्षेत्राची तीन ते चार वर्षांनी पीछेहाट झाली आहे. यातच एक क्षेत्र म्हणजे ऑटो इंडस्ट्री. आर्थिक वर्ष 2020 च्या पहिल्या महिन्यात विक्री व उत्पादन ठप्प झाल्याने ऑटो कंपन्यांची विक्री आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 75.49 टक्क्यांनी घसरून 14,91,216 युनिट्सची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री 60,84,478 युनिट्स इतकी होती. अशातच देशातील वाहन क्षेत्राची नियामक संस्थाने याबाबत एक चिंताजनक वक्तव्य केलं आहे. सीआयएएमने आर्थिक वर्ष 2021 मध्ये वाहन विक्री 25 ते 45 टक्क्यांनी खाली येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

सोसायटी आॅफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स 2024 पर्यंत वाहन विक्री सुधारेल व विक्रीत तेजी येण्याची अपेक्षा करत आहे. सीआयएएमचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले की, ऑटो इंडस्ट्रीमध्ये आधीच मंदी सुरु होती. यात कोरोना संकटामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आता ही परिस्थिती सुधारण्यासाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लागू शकतो, असे ते म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या