देशातील सर्वात स्वस्त बाईकचा नवीन मॉडेल लॉन्च, 90kmpl देते मायलेज

दुचाकी उत्पादक कंपनी बजाजने आपल्या सर्वात स्वस्त बाईक असलेल्या Bajaj CT100 चा नवीन मॉडेल हिंदुस्थानात लॉन्च केला आहे. या  कंपनीने ‘Kadak’ या नावाने हा मॉडेल लॉन्च केला आहे. कंपनीने अनेक नवीन फीचर्स या मॉडेल मध्ये दिले आहेत. तसेच मायलेजच्या बाबतीतही ही बाईक सर्वात उत्तम आहे.

फीचर्स

‘Kadak’ मध्ये कंपनीने आठ नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यात स्थिरतेसाठी क्रॉस-ट्यूब हँडलबार, रबर टँक पॅड आणि इंटिग्रेटरसाठी क्लीन लेन्स सारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे.

इंजिन आणि पॉवर

कंपनीने याच्या इंजिनमध्ये अधिक बदल केलेले नाही. नवीन मॉडेलमध्ये कंपनीने 99.27cc एअर-कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 7500rpm वर 8.1bhp पॉवर आणि 5500pm वर 8.05Nm टॉर्क जनरेट करते.

मायलेज

‘Kadak’ ही 90kmph मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

किंमत

कंपनीने या बाईकची एक्स-शोरूम किंमत 46,432 रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या