‘ही’ आहे देशातली सर्वात जास्त मायलेज देणारी सेदान कार, किंमत फक्त…

हिंदुस्थानात ग्राहक सेदान किंवा हॅचबॅक कार खरेदी करताना आधी मायलेज पाहतात. या दोन्ही सेगमेंटमध्ये एकाहून एक अशा चांगल्या कार उपलब्ध आहेत. जर तुम्हाला सेदान सेगमेंटमधील गाड्या पसंद आहे, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका कारची माहिती घेऊन आलो आहोत.

Hyundai Aura

दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी hyundai ने या वर्षाच्या सुरुवातीला ही कार हिंदुस्थानात लॉन्च केली होती. ही कार खूपच दमदार असून दिसायला ही आकर्षक आहे. कंपनीने याची किंमत 5.79 लाख रुपयांपासून ते 9.22 लाख रुपयापर्यंत ठेवली आहे. ही कार एकूण पाच प्रकारांमध्ये ई, एस, एसएक्स, एसएक्स + आणि एसएक्स (ओ) उपलब्ध आहे.

इंजिन

Hyundai Aura हिंदुस्थानात तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन (83PS / 114Nm), 1.2-लिटर डिझेल इंजिन (75 पीएस / 190Nm) आणि 1.2-लिटरची टर्बो पेट्रोल मोटर आहे. हे इंजिन 5 स्पीड एमटी आणि एएमटीसह देण्यात आले आहे. ही कार प्रतिलिटर 25kmpl मायलेज देते.

आपली प्रतिक्रिया द्या