Automobile – हिंदुस्थानातील 5 सर्वात दमदार स्कूटर

1672

हिंदुस्थानमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रगती होत असून आता दुचाकी आणि चारचाकींमध्ये बीएस-6 अॅमिशन नॉर्म्स (उत्सर्जन मानक) अपडेट केले जात आहे. 1 एप्रिल, 2020 पर्यंत बीएस-4 ची डेडलाईन असून त्यानंतर देशात बीएस-4 अॅमिशन नॉर्म्स (उत्सर्जन मानक) असणाऱ्या एकाही दुचाकी अथवा चारचाकीची विक्री होणार नाही. त्यामुळे सर्व ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या गाड्यांमध्ये बीएस-6 अॅमिशन नॉर्म्स (उत्सर्जन मानक) अपडेट करत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बीएस-6 अॅमिशन नॉर्म्स (उत्सर्जन मानक) च्या टॉपच्या पाच दमदार स्कूटरबाबत माहिती देणार आहोत.

1. होंडा अॅक्टिव्हा 6G –

honda-activa-bs6
गेल्या दोन दशकांपासून होंडा कंपनीच्या अॅक्टिव्हा या स्कूटरचे सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींमध्ये आघाडीवर आहे. कंपनीने नुकतीच ही स्कूटर बीएस-6 या इंजिनसह पुन्हा लॉन्च केली आहे. बीएस-6 इंजिनमुळे स्कूटरच्या किंमतीमध्ये 7 हजारांची वाढ झाली आहे. या स्कूटरच्या निर्मितीचे काम सध्या सुरू असून फेब्रुवारीपासून याची विक्रमी सुरू होईल.

2. टीव्हीएस ज्यूपिटर –

tvs-jupiter-bs6
टीव्हीएस कंपनीने प्रेक्षकांना सर्वाधिक आवडलेली ही स्कूटर बीएस-6 इंजिनसह लॉन्च केली आहे. ज्यूपिटर क्लासिक ज्यूपिटर रेंजची पहिलीच स्कूटर असून कंपनीने ही स्कूटर बीएस-6 इंजिनसह अपडेट केली आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 67,911 रुपये आहे.

3. सुझुकी एक्सेस –

suzuki-access-bs6
125 सीसी सेगमेंटमधील देशातील पहिली स्कूटर असणाऱ्या सुझुकी एक्सेसमध्येही बीएस-6 इंजिन अपडेट करण्यात आले आहे. या स्कूटरच्या ड्रम ब्रेक व्हेरिएन्टची किंमत 64,800 रुपये तर टॉप व्हेरिएन्टची किंमत 69,500 रुपये आहे.

4. यामाहा फॅसिनो –

yamaha-fascino-bs6
यामाहा कंपनीने यामाहा फॅसिनो (Fascino) ही स्कूटर गेल्याच महिन्यात हिंदुस्थानात लॉन्च केली. चार व्हेरिएन्टमध्ये ही स्कूटर लॉन्च करण्यात आली असून याची किंमत 66430 रुपये ते 69930 रुपयांमध्ये आहे.

5. हिरो मॅस्ट्रो –

hero-maestro-bs6
हिरो मॅस्ट्रो हिंदुस्थानातील पहिली बीएस-6 इंजिन सर्टिफाईड स्कूटर होती. या स्कूटरला जुलै 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तसेच फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर होणारी ही पहिली स्कूटर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या