Datsun च्या फॅमिली कारवर मिळत आहे 51 हजारांची सूट, जाणून घ्या किंमत…

Datsun च्या कार हिंदुस्थानात खूप प्रसिद्ध आहेत. कमी किंमत आणि उत्तम फीचर्समुळे ग्राहक ही कार खरेदी करण्यास आपली पसंती देताना दिसत आहेत. कंपनीने ग्राहकांचा रिस्पॉन्स पाहून आपल्या कारवर मोठी सूट जाहीर केली आहे. कंपनी आपली लहान फॅमिली कार Datsun Go कारवर ग्राहकांना 51,000 रुपयांची सूट देत आहे. फेस्टिव्ह सीजन लक्षात घेऊन कंपनी ग्राहकांना ही सूट देत आहे. आज आम्ही तुम्हाला याच कारच्या फीचर्स आणि किंमत बद्दल माहिती सांगणार आहोत.

इंजिन आणि पॉवर

Datsun GO मध्ये कंपनीने 1.2 पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 77PS पॉवर आणि 104Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन या दोन पर्यायसह येते.

फीचर्स

कारमध्ये वाहन डायनॅमिक कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, रिव्हर्स पार्किंग असिस्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7 इंचाचा स्मार्ट टचस्क्रीन देण्यात आला आहे.

किंमत आणि ऑफर

Datsun GO ची किंमत 3,99,000 लाख (एक्स-शोरुम) रुपये आहे. कंपनी यावर 51,000 रुपयांची सूट देत आहे. या सवलतीच्या ऑफरमध्ये 11,000 रुपयांचा इयर एंड बोनस, 20,000 रुपयांची रोकड सूट आणि 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या