
इटालियन दुचाकी उत्पादक कंपनी Ducati ने हिंदुस्थानात आपली नवीन Ducati Multistrada 950S लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार फीचर्सने संपन्न या बाईकच्या BS6 व्हर्जनची किंमत 15.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
बुकिंग सुरु
देशातील अनेक शहरांमध्ये या बाईकची बुकिंग सुरु झाली आहे. ग्राहक 1 लाख रुपयांच्या टोकणसह याची बुकिंग करू शकतात.
इंजिन
कंपनीने यात 937cc चे ट्विन सिलेंडर टेस्टस्ट्रॅट इंजिन दिले आहे. जे 9,000 आरपीएम वर 113 एचपी पॉवर आणि 7,750 आरपीएम वर 96 एनएम टॉर्क जनरेट करते.
फीचर्स
Ducati Multistrada 950S मध्ये 5 इंच टीएफटी कलर इन्स्ट्रुमेंट पॅनेल, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, डुकाटी स्काइकूक सस्पेन्शन, डुकाटी क्विक शिफ्ट अप / डाउन, डुकाटी कोर्नरिंग लाइट आणि राइड-बाय-वायर सिस्टम सारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय नवीन बाईकमध्ये हँड्स-फ्री सिस्टम आणि बॅकलिट स्विच-गेअर कंट्रोलचा समावेश आहे.


























































