Hero Xtreme 160R हिंदुस्थानात लॉन्च; 4.7 सेकंदांमध्ये पकडते 0 ते 60 प्रतितास वेग

दुचाकी निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपली नवीन Xtreme 160R बाईक हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केली आहे. हीरो मोटोकॉर्पने याआधी या बाईकचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. नवीन Xtreme 160R मध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहे. यात डिजिटल एलसीडी डिस्प्लेसह साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ फिचर देण्यात आले आहे.

Xtreme 160R कंपनीने 160 सीसी एअर-कूल्ड बीएस 6 इंजिन देण्यात आले आहे. जे एक्ससेन्सी तंत्रज्ञान आणि अ‍ॅडवान्स प्रोग्राम इंधन इंजेक्शनसह येते. इंजिनच्या आऊटपुटबद्दल बोलायचे झल्यास याचे इंजिन 8500 rpm वर 15 bhp पॉवर जनरेट करते.ही बाईक 4.7 सेकंदांमध्ये 0 ते 60 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडते.

किंमत

Hero Xtreme 160 च्या फ्रंट डिस्कसह सिंगल चॅनेल एबीएस व्हेरिएंटची किंमत 99,950 रुपये आहे. तसेच याच्या डबल डिस्क असलेल्या सिंगल चॅनल एबीएसची किंमत 1,03,500 रुपये आहे (एक्स-शोरूम).

आपली प्रतिक्रिया द्या