Honda Jazz नवीन अवतारात होणार लॉन्च; प्री-बुकिंग सुरू…

972

होंडा कार्स इंडिया आपल्या नवीन प्रीमियम हॅचबॅक Jazz चे अपडेट मॉडेल घेऊन येत आहे. लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने नवीन Honda Jazz ची प्री-बुकिंग सुरू केली आहे. अपडेट Jazz 21 हजार रुपयांमध्ये होंडा डीलरशिपवर बुक करता येते, तर 5 हजार रुपयात ग्राहक याची ऑनलाइन बुकिंग करू शकतात. जुन्या Honda Jazz च्या तुलनेत नवीन Jazz अधिक स्टायलिशय आणि स्पोर्टी लूकसह लॉन्च होणार आहे.

होंडाच्या या प्रीमियम कारमध्ये क्रूझ कंट्रोल, स्मार्ट एंट्री आणि पुश बटण स्टार्ट / स्टॉप सिस्टम अशी नवीन फीचर्स मिळतील. अपडेट Jazz च्या सीव्हीटी व्हेरियंटमध्ये स्टीयरिंग-व्हील माउंटेड ड्युअल-मोड ‘पॅडल शिफ्ट’ फीचर्स आहेत. कंपनीने यात पेट्रोल इंजिन दिले आहे. यात 1.2-लिटरचे आय-व्हीटेक पेट्रोल इंजिन उपलब्ध असेल. ज्यासह मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन पर्याय असतील.

कधी होणार लॉन्च?

Honda Jazz याच महिन्यात लॉन्च होणार आहे. बीएस 4 पेट्रोल मॉडेलपेक्षा याची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या