Honda Shine BS6 हिंदुस्थानात लॉन्च; मिळेल 14 टक्के अधिक मायलेज

3289

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) हिंदुस्थानी बाजारात आपली किफायतशीर Honda Shine बाईक BS6 इंजिनसह लॉन्च केली आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईकची किंमत आणि फीचर्स बद्दल सांगणार आहोत. तर जाणून घेऊ काय खास आहे या बाईकमध्ये…

इंजिन आणि पॉवर

Honda Shine BS6 मध्ये 124cc 4 स्ट्रोक एसआय BS6 इंजिन देण्यात आली आहे. जे 7500 Rpm वर 10.59 Hp पॉवर आणि 6000 Rpm वर Nm जनरेट करते. तसेच याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे. या बाईकमध्ये सेल्फ स्टार्ट अंडी किक स्टार्टचे पर्याय देण्यात आले आहेत. जे 14 टक्के अधिक इंधन इकॉनॉमी देते. याच्या इंधन टाकीची क्षमता 10.5 लीटर इतकी आहे.

किंमत

Honda Shine BS6 प्रारंभिक किंमत 67,857 रुपये ( एक्स-शोरूम ) इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या