नवीन लँड रोव्‍हर डिफेण्‍डरचा होणार डिजिटल लाँच, बुकिंग सुरु

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया लवकरच आपली नवीन एसयूव्ही Land Rover Defender हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनी एका डिजिटल कार्यक्रमाच्या माध्यमातून 15 ऑक्‍टोबर रोजी आपली ही एसयूव्ही लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने याची बुकिंग सुरू केली आहे.

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले: ”आम्‍ही वर्ष 2009 मध्‍ये हिंदुस्थानात प्रवेश केल्‍यापासून देशात पहिल्‍यांदाच प्रतिष्ठित नवीन डिफेण्‍डर सादर करण्‍याचा लँड रोव्‍हरसाठी अभिमानास्‍पद क्षण असेल. तसेच जगभरात दिग्‍गज उपस्थितीचा आनंद घेतलेली वेईकल सादर होताना पाहणे, हा हिंदुस्थानातील ऑटो उद्योगक्षेत्रासाठी देखील लक्षणीय टप्‍पा असणार आहे. या वेईकलच्‍या दर्जाला अनुसरून हिंदुस्थानी या वेईकलच्‍या आगमनासाठी आकर्षक व उच्‍च सर्वसमावेशक डिजिटल लाँच कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.”

सध्या जग्‍वार लँड रोव्‍हर हिंदुस्थानात 24 शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी आपल्या 27 डिलरशिपद्वारे वाहने विक्री करते. या एसयूव्हीच्या अधिक माहितीसाठी ग्राहक www.landrover.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या