Jawa Perak Bobber हिंदुस्थानात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

1807

Classic Legends ची सहाय्यक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली नवीन Jawa Perak Bobber बाईक हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. या बाईकला Perak हे नाव दुसऱ्या महायुद्ध दरम्यान 1946 मध्ये पॅरिस मोटर शोमध्ये सादर करण्यात आलेल्या Perak या बाईकवरच ठेवण्यात आलं आहे. महिंद्राची ही नवीन बाईक बीएस 6 मानकांनुसार बनवण्यात आलेली आहे.

jawa-3

Jawa Perak मध्ये 334 सीसीचे सिंगल-सिलेंडर, DOHC लिक्विड-कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 30 bhp पॉवर वर 31 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 293 सीसीवर आधिरीत आहे. जे Jawa आणि Jawa Forty Two मध्ये देण्यात आले आहे. मात्र या इंजिनची क्षमता या दोन बाईकच्या इंजिन पेक्षा अधिक आहे. याची मोटर 6-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

jawa-2

किंमत

या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.94 लाख रुपये इतकी आहे. कंपनी Perak ची बुकिंग केवळ 3 महिन्यासाठी सुरू करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या