फक्त 10 हजारांमध्ये Jawa Perak बाईक घेऊन जा घरी…

2202

जर तुम्ही नवीन क्लासिक रेट्रो लूक असणारी बाईक खरेदी करण्याच्या विचार करत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला हिंदुस्थानात उपलब्ध असलेल्या Jawa Perak या बाईक बद्दल सांगणार आहोत. हिंदुस्थानी बाजारात या बाईकची बुकिंग सुरु झाली आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईकची बुकिंग, फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

Jawa Perak मध्ये 334 सीसीचे सिंगल-सिलेंडर, DOHC लिक्विड-कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 30 bhp पॉवर वर 31 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 293 सीसीवर आधिरीत आहे. जे Jawa आणि Jawa Forty Two मध्ये देण्यात आले आहे. मात्र या इंजिनची क्षमता या दोन बाईकच्या इंजिन पेक्षा अधिक आहे. याची मोटर 6-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

कंपनीने हिंदुथानात या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये या बाईकची बुकिंग करू शकता. बुकिंग केल्यानंतर एप्रिल 2020 पासून या बाईकची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

किंमत

कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 1.94 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या