Jawa Perak ची जानेवारी 2020 मध्ये होणार बुकिंग सुरु, कधी होणार डिलिव्हर?

739

दुचाकी निर्माता कंपनी जावाने या वर्षी आपली Jawa Perak ही बाईक लॉन्च केली आहे. मात्र या बाईकची बुकिंग नवीन वर्षात जानेवारीपासून सुरु होणार आहे. कंपनीने याची किंमत आधीच जाहीर केली आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईकची किंमत, फीचर्स आणि बुकिंग केल्यानंतर कंपनी तुम्हाला कधी ही बाईक डिलिव्हर करणार याबाबत सांगणार आहोत.

Jawa Perak या बाईकचे हे नाव मूळ Perak मोटरसायकलवरून ठेवण्यात आलं आहे. 1946 मध्ये दुसर्‍या महायुद्धात ही बाईक पॅरिस मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. या बाइकमध्ये कंपनीने 334 सीसीचे सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. जे 30 बीएचपी पॉवर आणि 31 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन बीएस 6 असून हे 6-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

याची बुकिंग जानेवारी 2020 पासून सुरू होईल आणि एप्रिल 2020 पासून या बाईकची डिलिव्हरी सुरू होईल. कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 1.94 लाख रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या