महिंद्रा XUV300 BS6 डिझल एसयूवी हिंदुस्थानात लॉन्च

632

कार निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा मोटर इंडियाने आपली नवीन एसयूव्ही हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने 2019 मध्ये Mahindra XUV300 BS6 एसयूव्हीचा पेट्रोल मॉडल लॉन्च केला होता. आता कंपनीने याचा डिझल मॉडल हिंदुस्तानात लॉन्च केला आहे. कंपनीने आपले डिझल इंजिन सर्व -4 मीटर एसयूव्ही बीएस 6 उत्सर्जन मानकांमध्ये अपडेट केले आहेत. ही एसयूव्ही W4, W6, W8 आणि W8(O) या चार प्रकारात उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या एसयूव्हीच्या फिचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

Mahindra XUV300 मध्ये मिळणाऱ्या बीएस 6 डिझेल इंजिनच्या पॉवर जनरेटर बद्दल कंपनीने सध्या कोणतीही माहिती दिली नाही. या एसयूव्हीची पॉवर आणि टॉर्क बीएस 4 आवृत्तीसारखेच असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. BS4 डिझेल मोटर 116 PS पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते. Mahindra XUV300 BS6 च्या टीचर्स बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये कंपनीने रेन-केसिंग विन्डर्स, क्रूझ कंट्रोल आणि 7 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले देऊ शकते. स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स म्हणून, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस विथ ईबीडी आणि आयसोफिक्स चाईल्ड सीट मिळेल.

किंमत

Mahindra XUV300 BS6 डिझलची प्रारंभिक किंमत 8.69 लाख रुपये इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या