ही आहे देशातील सर्वात स्वस्त ‘सात सीटर’ कार; किंमत आहे… 

5894

हिंदुस्थानी ऑटोबाजारात अशा अनेक कार आहे ज्या एका मोठ्या कुटुंबासाठी फिट आहेत. जर तुम्हीही आपल्या कुटुंबासाठी एखादी स्वस्त आणि स्टाईलिश गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचा बजेट 5 लाखांपर्यंत असेल तर Renault Triber ही कार तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आम्ही तुम्हला या कारच्या फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन

Renault Triber कार मध्ये  999cc चे 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे  72 Ps पॉवर वर 96 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये मल्टी पॉइंट इंधन इंजेक्शन देण्यात आले आहे. Renault Triber ही कार इलेक्ट्रिक ब्लू, मून लाईट सिल्वर आणि आईस कुल व्हाईट रंगात उपलब्ध आहे. ही सात सीटर कार आहे.

1_578_872_0_70_http___cdni-autocarindia-com_galleries_20190814051319_renault-triber-front-static

फीचर्स

सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये एयरबॅग-ड्रायव, पेसेंजर एयरबॅग, Load Limiter + Pretensioner, स्पीड अ‍ॅलर्ट वॉर्निंग असे अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहे.

gandhi

डायमेंशन

या कारचा आकार लक्षात घेऊन कंपनीने याची लांबी 3990 मिमी, रुंदी 1739 मिमी, उंची 1643 मिमी, व्हील बेस 2636 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 182 मिमी, फ्रंट ट्रॅक 1547 मिमी ठेवली आहे. तसेच या कारमध्ये 40 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.

reno

किंमत

Renault Triber ची एक्स-शोरूम किंमत 4.49 लाख रुपये इतकी  आहे.

आपली प्रतिक्रिया द्या