
स्वदेशी प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपली बहुप्रतीक्षित मायक्रो एसयूव्ही Tata Punch लवकरच हिंदुस्थानात लॉन्च करणार आहे. आज आपण याच कारच्या डिझाइन, फीचर्स आणि याच्या लॉन्चिंगबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
डिझाइनमध्ये काय असेल खास?
या कारचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो पाहता ही कार ड्युअल-टोन म्हणजेच दोन रंगात पाहायला मिळत आहे. ही आगामी मायक्रो एसयूव्ही ALFA-ARC तयार करण्यात आली आहे. याचा इंपॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजवर आधारित आहे. यात एलईडी डीआरएल आणि हेडलॅम्प बंपरवर स्लॅट्स देण्यात आले आहेत. यात बूटवर क्रोम फिनिश पंच लेटरिंग आणि एलईडी टेललाइट्समध्ये एक खास ट्राय-एरो पॅटर्न आहे.
फीचर्स आणि इंजिन
Tata Punch चे कॅबिन फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, फ्लॅट-बॉटम मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारख्या फीचर्सने सुसज्ज असेल. यात रेवोट्रॉन 1.2-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हेच इंजिन टाटा टियागो आणि टाटा अल्ट्रोजमध्येही देण्यात आले आहे.
कधी होणार लॉन्च?
कंपनी आपली ही कार 4 ऑक्टोबर रोजी लॉन्च करू शकते. तसेच याची प्रारंभिक किंमत 4 ते 5 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी असू शकते.


























































