Tata Tiago हिंदुस्थानात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने हिंदुस्थानात आपली नवीन कार Tiago चा XTA व्हेरिएंट लॉन्च केला आहे. Tata Tiago XTA माध्यमातून कंपनीने आपल्या XT ट्रिममध्ये AMT ट्रान्समिशन पर्याय जोडला आहे. आज आपण याच कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

फीचर्स

या व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना टच स्क्रीनपासून अ‍ॅलोय व्हील्सपर्यंत अनेक उपयुक्त फीचर्स मिळतील. यात Harman 7 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 1-इंची अ‍ॅलोय व्हील्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कस्टर, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, डे-नाईट आयआरव्हीएम, फ्रंट आणि रियर पॉवर विंडोज सारखे फीचर्स मिळतील.

इंजिन

Tata Tiago मध्ये 1199cc चे 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 84.48 Hp ची पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड स्वयंचलित ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहे. स्वयंचलित ट्रांसमिशनसह यात XTA, XZA, XZA Plus, आणि XZA Plus व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

किंमत

कंपनीने या कारची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या