TVS Apache RTR 200 4V सिंगल चॅनल ABS हिंदुस्थानात लॉन्च, मिळणार जबरदस्त रायडींग मोड्स

आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी TVS Motor ने हिंदुस्थानात आपली नवीन Apache RTR 200 4V (सिंगल-चॅनल ABS) बाईक लॉन्च केली आहे. आपल्या सेगमेंटमध्ये ही पहिलीच बाईक आहे, ज्यात रायडींग मोड्स देण्यात आले आहेत. आज आपण याच बाईकच्या फीचर्स आणि किंमतबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

उत्तम रायडींग अनुभवासाठी यात 3 रायडींग मोड्स देण्यात आले आहेत. ज्यात स्पोर्ट, अर्बन आणि रेन मोडचा समावेश आहे. याच्या मदतीने रायडर वेगेवगेळ्या रोड प्रमाणे ड्रायव्हिंग करू शकता. यासोबतच यात अडजस्टेबल लिव्हर्सचाही समावेश आहे. या बाईकचा ड्युअल चॅनल ABS मॉडेलही बाजारात उपलब्ध आहे.

इंजिन

Apache RTR 200 4V मध्ये 197.75cc चे सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक, 4-वॉल्व, ऑईल कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 20.82 PS ची पॉवर आणि 17.25 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये RT-Fi तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

किंमत

कंपनी या बाईकची किंमत 1.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या