10 हजारात घरी घेऊन जा TVS Apache RTR 160 4V! कशी? वाचा…

2680

जर तुम्ही एक दमदार बाईक खरेही करण्याचा विचार करत आहात? तर हीच योग्य वेळ आहे. दुचाकी निर्माण करणारी कंपनी TVS ने आपल्या अनेक गाड्यांवर मोठी सवलत द्यायला सुरुवात केली आहे. यामध्येच TVS Apache RTR 160 4V चा ही समावेश आहे. ज्यावर कंपनी शून्य प्रक्रिया शुल्क आणि कमी डाउन पेमेंटसह फायनान्स सारख्या सुविधा देखील दिल्या जात आहे. आज आम्ही तुम्हाला Apache RTR 160 4V मिळत असलेल्या सर्व ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. याव्यतिरिक्त आम्ही तुम्हाला या बाईकच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत सांगणार आहोत. चला तर याबद्दल अधिक जाणून घेऊ…

काय आहे ऑफर?

TVS Apache RTR 160 4V वर कंपनीच्या वतीने 10,999  रुपयांची Low Down Payment ऑफर दिली जात आहे. बाईकसाठीच्या लोनसाठीचे शुल्कही न घेण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कर्जावर ही बाईक घेतल्यास ग्राहकाला 19,000 रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो असे कंपनीने सांगितले आहे.

TVS Apache RTR 160 स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

  • परफॉर्मन्स – TVS Apache RTR 160 4V मध्ये 159.7cc सिंगल सिलिंडर, 4 वॉल्व, आयन कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 16.8hp पॉवरवर  14.8Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गैरबॉक्सह सुसज्ज आहे.
  • किंमत – TVS Apache RTR 160 4V ABS ची एक्स शोरूम किंमत 83,145 रुपयांपासून सुरू होऊन 99,601 रुपयांपर्यंत आहे.
आपली प्रतिक्रिया द्या