TVS, Hero Pleasure Plus की Zest 110 कोणती स्कुटर आहे सर्वात स्वस्त? वाचा…

3363

आपण नवीन स्कुटर विकत घेण्याचा विचार करत आहात? हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला Hero आणि TVS च्या तीन बजेट स्कुटर बद्दल सांगणार आहोत. या तिन्ही स्कुटर 110 सीसी सेगमेंटमध्ये मोडतात. यामध्ये TVS Jupiter, Hero Pleasure Plus आणि  TVS Zest 110 या स्कुटरचा समावेश आहे. या स्कुटरचा लूक खूप सिंपल आणि स्टायलिश आहे. चला तर जाणून घेऊ या स्कुटरची परफॉर्मन्स आणि किंमत.

TVS Jupiter

परफॉर्मन्स – Jupiter मध्ये 109.7 सीसी, एयर-कुल्ड, 4-स्ट्रोक सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 7500 आयपीएस वर 8 पीएस पॉवर आणि 5500 आयपीएस वर 8.4 Nm टॉर्क जनरेट करते.

किंमत – TVS Jupiter च्या स्टॅण्डर व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 53,491 रुपये इतकी आहे. तर याच्या Grande Disc SBT व्हेरियंटची किंमत 62,346 रुपये इतकी आहे.

Hero Pleasure Plus

परफॉर्मन्स – Hero Pleasure Plus मध्ये 110.9 सीसीचे एयर-कुल्ड, ४-स्ट्रोक सिंगल सिलिंडर OHC इंजिन देण्यात आले आहे. जे 7500 आयपीएस वर 8.11 पीएस पॉवर आणि 5500 आयपीएस वर 8.70 Nm टॉर्क जनरेट करते.

किंमत – Hero Pleasure Plus च्या ड्रम ब्रेक व्हेरियंतची एक्स-शोरूम किंमत 49,300 रुपये इतकी आहे. तर याच्या ड्रम ब्रेक शीट मेटल व्हील व्हेरियंटची किंमत 47,300 रुपये इतकी आहे.

TVS Zest 110

परफॉर्मन्स – TVS Zest 110 च्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 109 सीसीचे एयर-कुल्ड, 4-स्ट्रोक सिंगल सिलिंडर, स्पार्क इग्निशन इंजिन देण्यात आले आहे. जे  7500 आयपीएस वर 8 पीएस पॉवर आणि 5500 आयपीएस वर 8.4 Nm टॉर्क जनरेट करतो.

किंमत –  TVS Zest Matte Seriesr ची एक्स-शोरूम किंमत  52,120 इतकी आहे. तर याच्या Zest Himalayan Highs Series व्हेरियंटची किंमत 50,620 रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या