TVS Victor BS6 हिंदुस्थानात होणार लॉन्च; जुन्या व्हेरियंट पेक्षा वेगळे असतील फीचर्स

586

दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस लवकच हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन TVS Victor BS6 बाईक लॉन्च करणार आहे. ही बाईक जुन्या व्हेरियंटपेक्षा सुमारे 6,000 ते 8,000 रुपयांनी महाग असू शकते. याच्या BS4 स्टँडर्डसह सुसज्ज टीव्हीएस व्हिक्टर ड्रम व्हेरियंटची किंमत 56,622 रुपये आहे. तसेच याच्या फ्रंट डिस्क ब्रेक व्हेरियंटची किंमत 58,622 रुपये इतकी असून याच्या प्रीमियम एडिशन व्हेरियंटची किंमत 59,602 रुपये इतकी आहे.

नवीन Victor बाईकमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळू शकतात. कंपनी यात नवीन ग्राफिक्ससह एलईडी हेडलाइट देखील देऊ शकते. यासह ही बाईक या सेगमेंटमध्ये नवीन असलेल्या Hero Passion Pro आणि Bajaj Platina 110 H-Gear इतर बाईक्सला टक्कर देऊ शकते. इतर फीचर्ससह यात टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क, ट्विन 5-स्टेप सिरीज स्प्रिंग रिअर संपेन्शन, 240 मिमी फ्रंट डिस्क / 130 मिमी ड्रम अप फ्रंट आणि 110 मिमी ड्रम मागील बाजूस दिले जाऊ शकते. TVS Victor BS6 मध्ये 110 सीसीचे इंजिन दिले जाऊ शकते. यासह, नवीन Victor मध्ये टीव्हीएसचे ग्लेड्स थ्रू टेक्नॉलॉजी (जीटीटी) देखील दिली जाऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या