Xiaomi ची इलेक्ट्रिक स्कूटर पाहिली का? किंमत फक्त 30 हजार 

1192

वर्ष 2019 मध्ये अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी आपले इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार जागतिक बाजारात लॉन्च केले आहेत. आता इलेक्ट्रिक वाहनाच्या शर्यतीत चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ही उतरली आहे. Xiaomi ने नुकतीच आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. Xiaomi ने याचे नाव Himo T1 असे ठेवले आहे. या स्कूटरची किंमत हिंदुस्थानी चलनात 30,700 रुपये इतकी आहे. ही स्कूटर दिसायला सायकल सारखी दिसते. मात्र यात मोटर देण्यात आली आहे. ही स्कूटर पेडल आणि मोटर दोन्हीवर चालते. चला तर जाणून घेऊ काय आहे खास या स्कूटरमध्ये…

फीचर्स

xiaomi_himo_t1

Xiaomi Himo T1 मध्ये एलइडी हेडलाईट सोबतच डिजिटल इन्स्ट्रुमेंट सारखे फीचर्स डेन्यूट आले आहेत. या स्कूटरमध्ये तुम्हाला स्पीड, बॅटरी आणि ट्रेकिंग सारखे अनेक नोटिफिकेशन ही मिळतात.

परफॉर्मन्स

d5ehn_lxkaaxpbl

Himo T1 14,000mAh ची लिथियन-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 60 किलोमीटरपर्यंत चालू शकते.

Xiaomi ने आपली ही स्कुटर केवळ चीनमध्ये लॉन्च केली आहे. ही स्कुटर इतर देशामध्येही लवकरच लॉन्च करणार आहे. मात्र ही स्कुटर हिंदुस्थानात कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीने अद्याप कोणती ही माहिती दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या