ऑस्ट्रेलियाची बरोबरी; चौथ्या सामन्यात न्यूझीलंडवर 50 धावांनी विजय

कर्णधार ऍरोन फिंचने झळकावलेल्या नाबाद 79 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर 50 धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आता उभय संघांमधील 7 मार्चला होणारी पाचवी लढत रोमहर्षक ठरील. दोन्ही संघ आगामी लढतीत मालिका विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 157 धावांचा पाठलाग करणाऱया न्यूझीलंडचा डाव 106 धावांमध्येच गडगडला. काईल जेमिसनने सर्वाधिक 30 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने 19 धावा देत तीन फलंदाज बाद केले. ऍश्टन ऍगर, ऍडम झाम्पा व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या