ऑस्ट्रियात हिमस्खलन; महिलेसह 8 जणांचा मृत्यू

ऑस्ट्रियात झालेल्या हिमस्खलनात आठ स्कीयरचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. पश्चिम ऑस्ट्रियातील बॅड हॉफगास्टीन परिसरात सुमारे 2,200 मीटर उंचीवर एका महिला स्कीयरचा हिमस्खलनात दबून मृत्यू झाला.

यानंतर दीड तासांनंतर साल्झबर्ग शहराच्या दक्षिणेला असलेल्या गॅस्टीन खोऱ्यात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोंगाऊ माउंटन रेस्क्यू सर्व्हिसने दिली.