दिल्लीत गेल्या पाच वर्षात सरासरी 50 हजार गर्भपात

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या पाच वर्षात वर्षाला सरासरी 50 हजार गर्भपात झाले आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तसेच प्रसृती दरम्यान मातांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत 2013-14 ते 2017-18 या काळात सरकारी आणि खाजगी आरोग्य केंद्रांमध्ये दोन लाख 48 हजार गर्भपात झाले आहेत. यात सरकारी केंद्रांमध्ये गर्भपातांची संख्या एक लाख 44 हजार इतकी आहे तर खाजगी केंद्रांमध्ये एक लाख तीन हजार गर्भपात झाले आहेत.

गेल्या पाच वर्षात गर्भपातात 42 महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील 40 महिलांचा मृत्यू सरकारी केंद्रांमध्ये झाले आहेत तर खाजगी केंद्रांमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत गेल्या पाच वर्षात प्रसृती दरम्यान 2305 महिलांचा मृत्यू झला आहे. आकडेवारीनुसार दरवर्षी हे प्रमाण वाढत आहे.