
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तीन हिंदुस्थानची राफेल लढाऊ विमाने पाडल्याचा पाकडय़ांचा दावा दसॉल्ट एव्हिएशनने फेटाळला आहे. दसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रपियर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पाकडय़ांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी सैन्याने पाच हिंदुस्थानी विमाने पाडली ज्यात तीन राफेलचा समावेश आहे. हिंदुस्थान पाकिस्तानमधील लष्करी तणावावर थेट भाष्य करण्याचे टाळत ट्रपियर यांनी म्हटले की, राफेल जागतिक दर्जाचे लढाऊ विमान असून पाकिस्तान जे म्हणत आहे की, हिंदुस्थानची तीन राफेल विमाने आम्ही पाडली हे साफ खोटे आहे. आमचा विश्वास आहे की, आम्हीच सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला हवेतून हवेत लढाई, जमिनीवर हल्ले, आण्विक प्रतिबंध आणि विमानवाहू वाहक तैनात करण्यास सक्षम असलेले एकच विमान हवे असेल तर राफेलची कोणीही स्पर्धा करू शकत नाही.




























































