अविनाश साळकर फाऊंडेशन क्रीडा महोत्सव, कुरार गावच्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेला उदंड प्रतिसाद

607

कुरार गावच्या अविनाश साळकर फाऊंडेशनने आयोजिलेल्या शालेय कबड्डी स्पर्धेला दिंडोशी, गोरेगाव, मालाड आणि कांदिवली परिसरातील शाळांनी उदंड असा प्रतिसाद दिला आहे. स्पर्धेत 22 शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे माजी महापौर, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी नाणेफेक करीत या स्पर्धेचे उद्घाटन केले.

सतत पाच वर्षे शालेय कबड्डीला भरारी देण्यासाठी अविनाश साळकर फाऊंडेशन ही स्पर्धा आयोजित करीत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ाला मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर, शिवसेना विधानसभा संघटक विष्णू सावंत, उपविभागप्रमुख गणपत वारिसे, नगरसेवक आत्माराम चाचे, शाखाप्रमुख राजेंद्र घाग, विजय गावडे, जिजामाता शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य सचिन कदम आणि अविनाश साळकर यांचे वडील तात्या साळकर, फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनघा साळकर हे मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा ‘स्ट्रीट स्पोर्टस्’ आणि ‘यू टय़ूब’ प्रचार वाहिनीवर लाइव्ह दाखाविण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या