Photo – गोल्डन-रेड साडीत आयेशा खानचा नवा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या प्रसन्न वातावरणात अभिनेत्री आयेशा खानचा रॉयल अंदाज लक्ष वेधून घेत आहे. तिने या खास प्रसंगी गोल्डन-रेड रंगाची अत्यंत आकर्षक आणि पारंपरिक साडी परिधान केली आहे. साडीला दिलेली लाल रंगाची बॉर्डर, त्यावरील बारीक जरीकाम आणि पारंपरिक नक्षीकाम तिच्या या लूकला अधिकच सुंदर बनवत आहे. साडीच्या पदरावर हेवी वर्कची लाल बॉर्डर आणि त्याला जोडलेले सोनेरी घुंगरू साडीला अत्यंत राजेशाही लूक देतात. या साडीवर तिने खास हाय-नेक ब्लाउजची जोड दिली आहे. सौंदर्याला अधिक खुलवण्यासाठी दोन्ही हातांत लाल-सोनेरी बांगड्या, कानात पारंपरिक झुमके, नाकात उठावदार नथ आणि बोटात नाजूक अंगठी असा परिपूर्ण साज तिने केला आहे.