#AYODHYAVERDICT – सोशल मीडियावर वॉच, मुंबईत 40 हजार पोलीस तैनात

817
supreme-court-of-india

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या अयोध्या प्रकरणावर शनिवारी सकाळी साडे दहा वाजता सर्वाच्च न्यायालय ऐतिहासिक निर्णय देणार आहे. यापार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियावरही पोलिसांचा वॉच असून मुंबईत 40 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

तर केंद्र सरकारने उत्तर प्रदेशमध्ये निमलष्करी दलाचे 4000 जवान पाठवले असून राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. यामुळे लखनौ, वाराणसी, कानपुर, अलीगढ़, बरेली, मुरादाबाद, रामपुर अशा संवेदनशील क्षेत्रांना छावणीचे स्वरुप आले आहे.

सर्वेाच्च न्यायालयात वर्षभरापासून सुरू असलेल्या अयोध्या प्रकरणावर पाच न्यायमुर्तींचे पीठ सुनावणी करणार आहे. हिंदू व मुस्लीम पक्षकारांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करत आपआपली बाजू ठामपणे मांडली होती. यास चाळीस दिवस उलटले असून आता संपूर्ण देश या खटल्याच्या अंतिम निकालाची प्रतिक्षा करत आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली या खटल्याचा निकाल लागणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमुर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या