अयोध्या प्रकरणी 1992 ला दाखल गुन्ह्यातील 350 जणांवर प्रतिबंधक कार्यवाही

रामजन्मभूमी प्रकरणी 1992 मधील आरोपीवर आज रोजी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. या अनुषंगाने परळीतील त्यावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यातील जवळपास 350 जणांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणे अपेक्षित आहे त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभरात हाय अलर्ट जारी केलेला आहे.कुठलीही अनपेक्षित घटना होऊ नये यासाठी परळीतही पोलीस प्रशासन सज्ज राहिलेले दिसून येत आहे.अयोध्या राम जन्म भूमी प्रकरणाचा निकाल कुठल्याही क्षणी येऊ शकतो.

निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन
न्यायालयाकडून येणाऱ्या अयोध्या निकाल प्रकरणी बीड जिल्हा पोलिस सक्रिय झालेले दिसत आहेत. जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस प्रशासनाने जागोजागी नाकाबंदी केली असून येणाऱ्या निकाल प्रकरणासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसत आहे.

काही आरोपींनी गाठली पन्नाशी तर काही झाले मयत
सन 1992 मध्ये अयोध्या प्रकरणी परळीत सहा गुन्हे दाखल झाले होते. त्यात जवळपास 350 आरोपी असून या सर्व आरोपींवर कलम 107 प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिले आहेत.परंतु यात 1992 प्रकरणाच्या वेळेचे काही जण सध्या 50 वर्षाच्या पुढे सरकले असून काही आरोपी चक्क बेडवर पडून असल्याचे समजते आहे.तर काही मयत झाले असून काही बाहेरगावी राहत असल्याचे ही समजते तर काही आरोपींवर कार्यवाही केल्याचे दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या