Baba Siddique Mureder – बाबा सिद्दीकी यांच्या खुनाप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

बाबा सिद्दीकी खुनाप्रकरणी प्रवीण लोणकर या 28 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर याचा भाऊ असून त्याला पुण्यातून अटक केली आहे. धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम या दोघांनी बाबा सिद्दीकी यांच्या खुनाचा कट रचला होता. हा कट रचण्यात शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकरचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.

 

माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.