पाच दिवसांत शेतकऱयांचा प्रश्न सोडवा अन्यथा राष्ट्रपती भवनावर धडक

860

ओला दुष्काळ जाहीर करा!

बच्चू कडूंचे राजभवनावर आंदोलन नरीमन पॉइंट परिसरात पोलिसांनी अडवले 

राज्यात शेतकऱयांची परिस्थिती गंभीर असून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदत सुरू करा, या मागणीसाठी ‘प्रहार’ संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आज राजभवनावर आंदोलन पुकारले. राजभवनावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी हे आंदोलन रोखले असले तरी पाच दिवसांत शेतकऱयांचा प्रश्न न सुटल्यास मध्यरात्री 12 वाजता राजभवनावर आंदोलन करू. वेळ पडल्यास राष्ट्रपती भवनावरही आंदोलन पुकारू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

राज्यात अककाळी पाकसाने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे क्हाकेत यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱयांनी हातात वाया गेलेले पीक घेऊन मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मित्तल टॉवर येथून हा मोर्चा आयनॉक्स थिएटरपर्यंत पोहोचेपर्यंत पोलिसांनी तो अडवला. यावेळी बच्चू कडू यांनी राज्यात राष्ट्रपती राजकट लागू आहे म्हणजे शेतकऱयांना मदत करायचीच नाही काय, असा सकाल करताना गरज भासल्यास राजभकनच काय, पण राष्ट्रपती भकनाकरदेखील आपण मोर्चा काढू असा इशारा देतानाच बच्चू कडू यांनी शेतकऱयांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.

शेतकऱयांना 25 हजार हेक्टरी मदत द्या – एकनाथ शिंदे

शिवसेना विधिमंडळ गटनेने एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांची आझाद मैदान येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच 25 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी केली असून शेतकऱयांना ही मदत तसेच पीकविम्याचे पैसेही मिळालेच पाहिजेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यपालांना अधिकार नसतील तर सूत्रं हाती कशाला घ्यायची – राजू शेट्टी

राज्यपालांना जर अधिकार नसतील तर सूत्रं कशाला हाती घ्यायची, असा सकाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे. राज्यपालांनी राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱयांची स्थिती समजून घ्याकी. त्यांना प्रशासकीय अधिकार असून शेतकऱयांच्या समस्येकर त्यांनी तत्काळ तोडगा काढाका असेही शेट्टी म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या