बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : संतप्त नागरिकांचा बदलापूर स्थानकात रेल रोको, वाहतूक ठप्प

बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्यानंतरही पोलिसांकडून आरोपी आणि शाळेला पाठीशी घातले जात आहे. त्याविरोधात आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात एकत्र येत रेल रोको आंदोलन केले आहे. आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उभे राहून पोलीस, शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध घोषणा देत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

12 ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुकलींवर अत्याचार केले. मुलींच्या पालकांनी तक्रार करूनही 11 तासानंतर या नराधमाला पोलिसांनी अटक केली. बदलापूरात शिवसेनेसह व्यापारी असोसिएशन, रिक्षा संघटना यासह विविध संस्थांनी बंदची हाक दिली आहे. दरम्यान सकाळी सहा वाजल्यापासून संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने करत आहेत.

सोमवारी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शहर संघटक दक्षता तांबे यांच्या नेतृत्वाखाली शाळेसमोर निदर्शने करण्यात आली होती.