जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीने शहरातील गांधी चमन येथे आज 22 ऑगस्ट गुरुवार रोजी राज्य सरकारविरोधात मटका फोडो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी नाकर्त्या सरकारच्या विरोधात महिला काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी प्रचंड घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. बदलापूरमध्ये दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. मात्र या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणा दाखवण्यात आल्याने पालकांनी तीव्र आंदोलन केले. मात्र या आंदोलकांवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला शिवाय हे आंदोलन राजकीय पुरस्कृत असल्याचेही नाकर्त्या सरकारने म्हटले होते. त्यामुळे राज्य सरकारविरोधात शहरातील गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीने मटका फोडो आंदोलन करण्यात आले आहे. यासह गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.. असं म्हणत नराधमाच्या फाशीचीही मागणी यावेळी आंदोलक महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, तालुकाध्यक्षा इंदूबाई मैद,नंदा सांडू रगडे, अर्चना राऊत, रमा राठोड, मंदा विठ्ठल कांबळे,पद्मा भगवान रगडे,सुनिता ताराचंद पिपळे,आरती ज्ञानेश्वर कांबळे,ज्योती गजानन कांबळे,खैरूनिसा सय्यद,विभा लांखे, रूख्मन नाना कांबळे,उज्ज्वला कचरु मगरे,दिक्षा विजय रगडे,गुफा भिमराव रगडे,विमल देवीदास म्हस्के,लक्ष्मी तात्याराव कांबळे,वंदना बाबासाहेब रगडे,ताई राजू पवार,रेखा देवसिंग पवार,विमल लक्ष्मण धोत्रे यांच्यासह अधिपदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी यात सहभाग घेतला होता.