कोलकाता डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण देश संतापात असताना आता बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मंगळवारी या घटनेविरोधात संतप्त बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केले आहे. गेल्या तीन तांसांपासून मध्य रेल्वेची बदलापूरवरून जाणारी लोकलसेवा ठप्प आहे. या प्रकरणावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी फोन वरून चर्चा केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या पालकांना बसवून ठेवलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता त्यांना अकरा तास पोलीस स्थानकात बसवून ठेवले, त्यामुळे त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण तीन महिन्यात फास्ट ट्रॅक मध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशीही मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी