बगदादी संपल्याचे पुरावे नाहीत! अमेरिकी संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांचा दावा

856

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला टिपल्यानंतर इसिसचा म्होरक्या बगदादीला अमेरिकेच्या विशेष कमांडोंनी सीरियात खात्मा केला. एखाद्या चित्रपटातील दृश्य असावे अशा स्वरूपाचा व्हिडिओही अमेरिकेचे प्रसिद्ध केला. पण आता अमेरिकेच्या एका अधिकाऱयानेच बगदादीच्या खात्म्याबाबत शंका उपस्थित केली आहे. इसिसचा म्होरक्या बगदादी संपल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा संरक्षण खात्याच्या चार अधिकाऱयांनी केला आहे.

अबू बकर उल बगदादीचा खात्मा करताना सुरू असलेली मोहीम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये बसून पाहिली. त्यानंतर बगदादीचा कसा खात्मा झाला, तो मरण्याआधी कसा रडत होता याची माहिती ट्रम्प यांनी दिली. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी या केलेल्या सगळय़ा दाव्यांबद्दल संरक्षण सचिव, तीनही दलांचे प्रमुख आणि रिजनल कमांडर यांनाही काही माहिती नाही, असा दावा संरक्षण खात्यातील चार अधिकाऱयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला.

बगदादी याच्याविरोधात केलेल्या मोहिमेची माहिती त्यांच्याकडे नाही. तो मेल्याची खात्री पटावी यासाठी परिस्थितीजन्य कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. कोणत्याही अहवालात ट्रम्प यांनी केलेल्या दावांची पुष्टी होत नाहीत, असेही या अधिकाऱयांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या