चड्डीमुळे पटली ओळख, DNA जुळवण्यासाठी बगदादीच्या अंडरवेअरची मदत

3203

अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी इसिसचा म्होरक्या अबु बगदादी याला कंठस्नान घातलं. बगदादीविरोधातील कारवाईत अमेरिकेला सिरिया, इराक, तुर्कस्थान आणि रशियाने मदत केली तर सिरियन कुर्द बंडखोरांनी बगदादीची खबर अमेरिकेला दिली होती. बगदादीवर अडीच कोटींचे बक्षीस होते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या गुप्तहेराने बगदादीचा ठावठिकाणा अमेरिकेपर्यंत पोहोचवला, त्याने बगदादीला ठार केल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठीही मदत केल्याची माहिती मिळत आहे. या खबऱ्याच्या मदतीने अमेरिका आणि सीरिया-कुर्दीश सुरक्षा दलांनी बगदादीच्या निकटवर्तीयांपर्यंत हेर पेरून ठेवले होते. तसंच अमेरिकेला मदत करणाऱ्या कुर्दिश सैन्याशीही तो गुप्तहेर संपर्कात होता. त्याने इदलिब इथल्या बगदादी असलेल्या जागेची खडानखडा माहिती अमेरिकेकडे पोहोचवली होती. या गुप्तहेरामुळेच अमेरिकेला ही कारवाई यशस्वी करण्यात मदत मिळाली.

बगदादीचा खात्मा केल्यानंतर त्याची ओळख पटवणं हा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यासाठीही या गुप्तहेराने आधीच काम करून ठेवलं होतं. त्याने आधीच बगदादीने वापरलेली अंतर्वस्त्र लपवून ठेवली होती. जेव्हा बगदादीचा खात्मा करण्यात आला तेव्हा त्याच्या रक्ताचे थेंब आणि अंडरवेअरचा डीएनए जुळवण्यात आला. तो 100 टक्के जुळवल्यानंतरच बगदादी ठार झाल्याची बातमी देण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या