बजरंग पुनिया व संगीता फोगाट अडकले लग्न बंधनात, सप्तपदीच्या जागी घेतल्या अष्टपदी

हिंदुस्थानचा स्टार व अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया हा प्रसिद्ध कुस्तीपटू संगीता फोगाट लग्नबंधनात अडकले आहे. संगीता ही अर्जुन पुरस्कार विजेते महावीर फोगाट यांची मुलगी तर गीता व बबिता फोगाट यांची बहिण आहे. फोगाट कुटुंबीयांच्या हरयाणातील दादरी जिल्ह्यातील बलाली गावात हा लग्न सोहळा पार पडला.

कोरोनाची परिस्थिती असल्याने हा विवाहसोहळा कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. बजरंग पुनिया अवघ्या 31 पाहुण्यांसह बलाली गावी पोहोचला होता. तर संगीता फोगाटकडून 50 पाहुणे उपस्थित होते

सप्तपदीच्या जागी घेतल्या अष्टपदी

बजरंग पुनिया व संगीता फोगाट यांनी सप्तपदीच्या जागी अष्टपदी घेतली आहे., या दोघांनी आठ फेरे घेऊन आठवा फेरा घेताना बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश दिला.

नुकतीच बबिताने दिली आहे गोड बातमी

संगीताची मोठी बहिण बबिता फोगाट ही गरोदर असून तिने नुकतीच सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या बबिताचे गेल्यावर्षी विवेक सुहाग याच्यासोबत लग्न झाले होते विवेक हादेखील कुस्तीपटू असून त्यांनी भारत केसरी हा किताब जिंकलेला आहे सध्या तो भारतीय रेल्वे मध्ये कामाला आहे

आपली प्रतिक्रिया द्या